जीवन ध्येयावर लक्ष

Share

प्रत्येकच योद्धा,खेळाडू किंवा स्पर्धक खऱ्या सामन्याच्या आधी पूर्वतयारी करतोच. ज्याला खेळाच्या भाषेत वॉर्मअप म्हणतात. आपल्या पहिल्या पाठातून आणि त्यात शिकलेल्या कृतीतून आपला वॉर्मअप झालाच आहे. मित्रांनो पहिल्या पाठातील कृती करताना तूम्हाला वेगवेगळे अनुभव आलेच असतील. तूम्ही वेगवेगळ्या सकारात्मक – नकारात्मक भावना अनुभवल्या असतील. आता ते सर्व अनुभव स्वतः सोबत असेच ठेवून आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करुयात.

पुढचा प्रवास सुरु करण्याधी काही महत्वाची तयारी करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमची डायरी हातात घ्यावी लागेल आणि त्यात अशा व्यक्तींची नावं लिहावी लागतील जे तूम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कळत – नकळत मदत करत आहेत किंवा भविष्यात मदत करु शकतील. 

चला पट्कन लिहुन पुढिल तक्ता पुर्ण करा.

व्यक्तीचे नाव                  क्षेत्र

१. अजय दरेकर              विद्यार्थी तरूण विकास

२. केतन गावंड सर         उत्कृष्ट प्रशिक्षक 

३. संध्या साईल मॅडम     आदर्श शिक्षिका

४. वेस ची संपूर्ण टिम     विद्यार्थी तरूण विकास

५. सचिन तेंडुलकर         नम्रपणा/ ध्येयनिष्ट 

६. 

७. 

८.

९.

१०.

तुमचे मार्गदर्शक आई वडील, शिक्षक, मित्र यांची नावे व क्षेत्र लिहायला विसरु नका. कारण ही अशी मंडळी आहे जी निस्वार्थी भावनेने आपल्याला मदत करत असतात. तुमच्या यादीमध्ये कमीत कमी १० आणि जास्तीत जास्त तुम्हाला हवीत तेवढी नावे लिहा. माझ्या यादीमध्ये मी स्वतःचे नाव देखील लिहिले आहे व माझ्या ध्येयाव्यतीरीक्त व्यक्तींची नावे सुद्धा लिहिली आहेत. काही व्यक्तींना मी प्रत्यक्ष भेटलो नाहिये पण कळत – नकळत मी त्यांच्या कृतीतून भाषणातून भरपूर शिकलोय. त्यामूळे ही यादी तयार केल्याशिवाय मुळीच पुढचा पाठ वाचू नका, आणि हो या यादीत काही जागा रिकामी ठेवा पुढे भेटलेल्या काही व्यक्तींची नावे ह्यात लिहायचे आहेत.

तूम्ही विचार करत असाल हा माणूस मुळ मुद्द्यावर कधी येईल ? कारण मुळ मुद्दाच म्हणजेच विषय “जीवन ध्येय”

(life purpose) हा आहे. आणि ते सोडून आपण वेगळ्याच विषयवार बोलतोय किंवा वेगळ्याच विषयवार चर्चा करतोय पण मित्रांनो ही तयारी पुर्ण असेल तरच तुम्हाला पुढचा विषय सोपा जाईल व त्याचा नेमका अर्थ समजेल. त्यामूळे तुमच्या मनात ह्या पुस्तकाबद्दल पुर्ण विश्वास बाळगा आणि सांगितलेली प्रत्येक कृती स्वखुशीने करा. असे केल्यास परिवर्तन सहज घडेल.

खुप खुप शुभेच्छा !

” IT IS NOT ENOUGH TO HAVE LIVED, WE SHOULD BE DETERMINED TO LIVE FOR SOMETHING. “

– WINSTON CHURCHILL 

यशस्वी होण्यासाठी काही जणांनी मोटिवेशनल व्हिडिओ पाहिले असतील, बऱ्याच जणांनी पुस्तके वाचले असतील किंवा अनेक जण यशस्वी व्यक्तींना भेटले असतील. त्यामूळे आपल्याला त्यांच्या यशाचा गाभा (म्हणजेच इमारतीचा पाया ) समजून घेणे फार महत्वाचे आहे. त्यामूळे आधी आपण यशस्वी माणसे व त्यांचा पाया समजून घेणार आहोत त्यासाठी मी पुढे एक तक्ता दिला आहे तो तक्ता तुम्हाला पुर्ण भरायचा आहे पण तो तक्ता भरताना जागरूक रहा आणि जे मुद्दे लक्षात येतील ते लगेच लिहुन काढा. हा तक्ता भरण्यासाठी तूम्ही गूगल चा उपयोग केलात तरीही चालेल.

A. व्यक्तिचे नाव.

B. क्षेत्र.

C. शिक्षण.

D. आलेल्या अडचणी.

E. शिक्षणा व्यतिरिक मिळवलेले ज्ञान.

F. विशेष कौशल्य. 

G. त्यांच्या साठीचे आदर्श व्यक्ती.

वरिल माहिती भरताना तुमच्या काय लक्षात आले ? 

मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो तूम्ही त्याची उत्तरं लिहुन काढा म्हणजे ह्या कृतीतून आपल्याला काय शिकायचे आहे ते तुमच्या लक्षात येईल.

१. प्रत्येक व्यक्तीने किती क्षेत्रांमध्ये कार्य केले आहे ?

२. वरिल प्रत्येक व्यक्ती त्यांच्या शालेय / महाविद्यालयीन आयुष्यात हुशार होतेच का ?

३. प्रत्येकाला समाजाकडुन पाठिंबा मिळालाच होता का ?

४. कृती करत असताना त्यांचे संपुर्ण लक्ष फक्त पैशांकडे होते का ?

५. प्रत्येकाने काही मिळवण्यासाठी काम केले की स्वतःला घडवत असताना त्यांना सर्वकाही मिळत गेले ?

६. प्रत्येकालाच कष्ट करावे लागले का ?

७. प्रत्येकालाच काही विशेष कौशल्य आत्मसात करावे लागले का ?

८. प्रत्येकालाच अडचणींना सामोरे जावे लागले का ?

९. अपयश मिळाल्यावर प्रत्येक व्यक्ती आपल्याला क्षेत्रात टिकून राहिले का ?

१०.

११.

आले का काही लक्षात. ते म्हणजे…

१. यशस्वी माणसे सर्वात प्रथम स्वतः मधील सुप्त गुणांना ओळखतात.

२. त्यानंतर स्वतः मधील सुप्त गुणांचा समाजामध्ये कुठे उपयोग होईल ह्याचा विचार करतात. इथेही त्यांची आवड वा विचार असतोच.

३. मग वरील दोन प्रश्नांचे उत्तर एकत्र करून ते कृती करायला सुरुवात करतात.

४. त्या कृती करत असताना ते बऱ्याच वेळेला धडपडतात अपयशी ठरतात. बऱ्याचदा लोक त्यांना हसतात पण ते डगमगत नाहीत पुन्हा उठतात आणि नव्याने सुरुवात करतात.

५. ते त्यांचा वेळ, पैसा, कष्ट सार काही पणाला लावतात.

६. दिवस रात्र एकाच गोष्टीचा विचार करतात.

७. सर्व सुख सोयी बाजूला ठेवतात.

८. बऱ्याच माणसांच्या बाबतीत आढळले आहे की, ते त्यांच्या तरुणपणात मौजमजे पेक्षा ध्येयवेडे झाले होते व त्यांनी त्यांचे सर्वस्व एकाच गोष्टीसाठी लावले.

९. ह्याचे कारण असे की, तरुणपणात फक्त आपले शरीरच नाही तर मन आणि बुद्धी सुद्धा चपळ असते. उत्साही असते. त्यामुळे ह्याच दिवसांमध्ये जास्तीत जास्त कल्पनांवर काम व मेहनत करणे हे यशाचे महत्वाचे गमक आहे.

YOU WHERE PUT ON THIS EARTH TO ACHIEVE YOUR GREATEST SELF. TO LIVE OUT YOUR PURPOSE AND DO IT COURAGEOUSLY.

वरील वाक्यामध्ये अधोरेखित शब्दांना फार महत्त्व आहे. अध्यात्मिक दृष्टीने किंवा व्यवहारिक दृष्टीने जरी पाहिले तरी ह्या पृथ्वीवर येण्यामागे आपले एक कारण आहे. ते कारण ज्याला समजते तो व्यक्ती सफल झालाच म्हणून समजा. ‘ स्वतःचा शोध घेणं’ ही करीअर च्या दृष्टीने सर्वात पहिली तसेच सर्वात महत्त्वाची पायरी आहे आणि पुढील पायरी म्हणजे स्वतःचा शोध लागला की त्या अनुषंगाने आपल्या जीवन ध्येयाला अनुसरून कृती, ती सुद्धा courageously ( आत्मविश्वासाने, धैर्याने ) घेणे अतिमहत्त्वाचे आहे. कारण जगातील ९५% तरुण इतरांचे ऐकुन, घाबरून परिस्थितीला बळी पडून, जीवन मुल्याला महत्व देत नाहीत आणि त्या कारणाने सर्व साधारण आयुष्य जगतात. आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात सर्वांचा विरोध असताना कृती करण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास व प्रचंड सकारात्मकता लागते, आणि या दोन्ही गोष्टी स्वतःचा खोलवर अभ्यास केल्यावर गवसतात. 

ही पायरी महत्वाची आहे म्हणून घाबरून जाण्याचे काही कारण नाही. आज आपण कृती करताना कदाचित काहींना लगेच उत्तर मिळतील आणि काहींना वेळ लागेल. परंतु विश्वास बाळगा. 

हवे असल्यास लगेच माझ्यासोबत व्हॉट्सप किंवा पत्रव्यवहार करा. मनात कोणतीही शंका न बाळगता पुढची कृती करा.

पुढची कृती करण्यासाठी ह्या पाठाच्या सुरवातीला आपण जी कृती केली होती आता त्यात तुम्हाला आयुष्यातील महत्वाच्या व्यक्ती आणि तुमचा मित्रपरिवार यांना एक प्रश्न विचारायचा आहे. 

“माझ्यातील २ ते ५ सकारात्मक गुण जे तुम्हाला जाणवतात ते सांगा” आता पुढील १५ ते २० दिवस तुमच्या ओळखीच्या प्रत्येक व्यक्तीला हा प्रश्न विचारा आणि मिळणाऱ्या उत्तरांची नोंद ठेवा. एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या बद्दल सकारात्मक गुण मिळवायचे आहेत. तुमच्या जवळच्या कमीत कमी २५ ते ३० आणि जास्तीत जास्त ५० ते १०० लोकांना हा प्रश्न विचारा. कारण तुमच्यातील सकारात्मक गुणांची हीच यादी तुम्हाला तुमच्या जीवन ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे. 

वरील कृती पूर्ण झाल्यावर नोंद घ्या की तुमच्यातील कोणत्या सकारात्मक गुणांची पुनरावृत्ती झाली आहे. उदा. तू शिस्तप्रिय आहेस, तू क्रिएटिव्ह आहेस, तू निस्वार्थीपणे मदत करतोस. अशा अनेक उत्तरांमध्ये जे २ ते ३ गुण अनेकवेळा रिपीट झाले आहेत त्यांची वेगळी नोंद करा. आता तुम्ही वेगळे तयार केलेल्या यादीबद्दल विचारमंथन करा. स्वतःला विचारत रहा की खरच मी असा आहे का ? किंवा माझ्या मध्ये हे सकारात्मक गुण आहेत का ? कारण “लोक तुमच्याबद्दल काय बोलतात ह्यापेक्षा तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटते” हे नेहमीच अधिक महत्वाचे असते. म्हणूनच स्वतःला आत्मचिंतनाची सवय लावून घ्या. ह्या पाठात वाचलेल्या तिन्ही कृती महिनाभर सातत्याने करीत रहा. जेव्हा शांत वेळ मिळेल स्वतःबद्दल विचार करत रहा. आणि शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारा, ‘ मला समाजाच्या कोणत्या विभागात, क्षेत्रात काम करायला प्रचंड आवडेल ?’ उदा. मला शिक्षण क्षेत्रातच काम करायचं आहे. मुळीच काळजी करू नका उत्तर मिळाले तर ठीक आणि नाही मिळाले तरीही ठीक. कारण ही एक प्रक्रिया आहे. तुमच्या उच्चतम जीवन ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी. त्यामुळे लगेच कामाला लागा. 

आणि मला संपर्क करायला विसरू नका.धन्यवाद !
– श्री. अजय खोतू दरेकर 

Subscribe our YouTube Channel @ – 

https://www.youtube.com/channel/UCdgL8moO1zLc2XmVk64zepw


Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top