ऊर्जेचा विनियोग म्हणजेच यशाचा योग

Share

Don’t take rest after your first victory because if you fail in second more lips are waiting to say that your first victory was just a luck. – Bharat Ratna – Dr. A.P.J Abdul Kalam

हे वाक्य लिहिण्यामागचे कारण म्हणजे मागील काही दिवसांत तुम्ही परिवर्तनासाठीचा करत असलेल्या विकासाकडे तुमच्या आजूबाजूच्या बऱ्याच लोकांचे लक्ष आहे. प्रत्येकच व्यक्ती पाहत आहे की तुम्ही कसे दिवस-रात्र अनेक अडचणींना सामोरे जाऊन परिवर्तनाचा अट्टाहास धरला आहात. त्यामुळे थांबू नका कारण “थांबला तो संपला” आपण आपल्या आजूबाजूला असे बरेचसे लोक पाहतो जे शालेय व महाविद्यालयीन आयुष्यात उत्तम कामगिरी करत होते. पण आता मात्र स्वस्थ, निराश किंवा आहेत त्या परिस्थितीत समाधान मानून; आपली स्वतःची सर्व शस्त्र टाकून नशिबाला कोसत बसलेली असतात. कारण सुरुवातीला मिळालेल्या यशाच्या गुंगीत राहून आता मला सर्व कळते सगळे जमते ह्याच भ्रमात ते राहतात. आणि अशा वेळेस माझ्या गुरूने मला दिलेला मंत्र खूप मोलाचा ठरतो

SUCCESS IS A JOURNEY !

पुढील कृतीसाठी तयार आहात ना ??

हे वाक्य ओळखीचे वाटते का ते बघा “अरे सगळं पटतंय रे.. सगळं करायला हवे पण वेळ मिळत नाही ना !!” हे वाक्य ऐकलेच असेल ना ? तुम्ही स्वतः हे वाक्य किती वेळा वापरता ??

वेळ नियोजनावर बरीचशी पुस्तके वाचल्यानंतर, अनेक व्याख्याने ऐकल्यानंतर, जेव्हा मला स्वतःमध्ये काहीच फरक/बदल करता आला नाही. तेव्हा मी पुन्हा एकदा माझ्या गुरुंकडे गेलो आणि त्यांना माझी व्यथा सांगितली तेव्हा ते मला म्हणाले;

“There is nothing like time management exist in the world there is only thought management on which we must work time will be manage automatically”

ह्याच काही ओळींनी माझा अनुभव बदलायला मदत केली. आणि तोच अनुभव मला आता तुम्हाला द्यायचा आहे. तुम्ही विचार कराल ऊर्जेचा विनियोग (एनर्जी मॅनेजमेंट) या पाठात (टाईम मॅनेजमेंट) वेळेचे नियोजन कसे काय आले ?? या दोन्ही गोष्टींचा खूप मोठा संबंध आहे. तुम्ही आता या वयात जेवढे धावू शकता, प्रवास करू शकता, काम करू शकता, अडचणींना सामोरे जाऊ शकता, तेवढ्याच जोमाने ह्या गोष्टी तुम्ही आणखीन पंधरा ते वीस वर्षांनी करू शकता का ?? शक्यतो उत्तर नाहीच असेल. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल जी शारीरिक, मानसिक, बौद्धिक ऊर्जा सध्या तुमच्यात आहे त्याचा उपयोग जर तुम्ही आत्ता केला तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात कमी वयात जास्त प्रगती करू शकाल.

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले अगणित, विपरीत आणि आणि कठीण परीस्थितीत ते हे करू शकले कारण बाल शिवाजी ने आणि तारुण्यातील शिवबा ने वाचन, व्यायाम, युद्धशास्त्र गनिमीकावा हे शिकण्यास प्राधान्य दिले. एवढ्या कमी कालावधीत महाराजांचे जगाला थक्क करणारे यश हे त्यांनी त्यांच्या ऊर्जेचा विनियोग केला म्हणूनच शक्य झाले.

आणखीन खोलवर विचार केलाच तर लक्षात येईल की एवढ्या लहान वयात इतकी अफाट शक्ती महाराजांनी कशी एकवटली ?? तर उमगेल की यामागे शक्ती होती विचारांची, जिजाऊंचे विचार, गुरूंचे विचार, वाचनाचे विचार ह्या अफाट विचारांनी महाराज घडले म्हणून आपल्या विचारांचे मॅनेजमेंट जमणे अत्यंत गरजेचे आहे.

आपण वेळ वाया घालवतो म्हणजे नक्की काय करतो ? आपण अशा विचारांवर कृती करतो ज्याचा तुमच्या किंवा समाजाच्या विकासाशी काही ही संबंध नाही. आजच्या घडीला तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) हा सर्वात मोठा वेळ खाणारा मार्ग ठरत आहे. दुसरे म्हणजे मौजमजेची माध्यमे एंटरटेनमेंट मीडिया. तिसरे विनाकारण केली जाणारी खरेदी (शॉपिंग) मोबाईल गेम्स व इतर माध्यमातून दररोज तासन तास वेळ घालवणारी बाल तरुण मंडळी आपण पाहतोच. ह्याला अपवाद म्हणजे बरीच तरुण मुलं आहेत जी आय.ए.एस आय.पी.एस सारख्या competetive परीक्षांना सामोरे जाण्यासाठी दिवस रात्र झटत आहेत. समाजसेवेसाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेली मंडळी आपण पाहतो. प्रत्येक यशस्वी माणूस स्वतःचा वेळ वाया न घालवता ध्येयासाठी झटत असतो. जी व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचा पूर्णपणे सदुपयोग करतात त्याचे कारण वेळेचे नियोजन नसून विचारांचे नियोजन आहे. वरील ध्येयवादी मंडळी नेहमीच ध्येयाने झपाटलेली असतात म्हणजे ध्येयाशी निगडित विचार करत असतात आणि त्यांचे हे ध्येयवादी विचारच त्यांना योग्य मार्गावर ठेवतात व वेळेचा योग्य उपयोग करायला लावतात. 

“उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.   – स्वामी विवेकानंद

विवेकानंदांचे वरील वाक्य आपल्याला याची प्रचिती देते. म्हणजे आता हे स्पष्ट झाले आहे की वेळेचे नियोजन तरच होईल जर आपण विचारांचे नियोजन केले. मग कसे करायचे विचारांचे नियोजन ??

आपल्या मनात विचार कोठून येतात ?? आपण जे ऐकतो, वाचतो, पाहतो, अनुभवतो ती माहिती आपल्या विचारांचा पाया आहे. ही माहिती आपल्या पाच ज्ञानेद्रियांपर्यंत येते. मग ह्या माहितीचे स्तोत कोणते ??

१. आपल्या कुटुंबातील सर्व मंडळी

२. आपल्या घरी असलेले टीव्ही रेडिओ

३. इंटरनेट

४. शिक्षक

५. मित्र

६. सहकारी

७. इत्यादी…

मग चला जाणून घेऊया तुमचा मेंदू कोणत्या प्रकारची माहिती गोळा करतोय तुमच्या विचारांसाठी. त्यासाठी पुन्हा आपल्याला एक कृती करावी लागणार आहे.

कृती : पुढील एक आठवडा आपल्याला आपल्या विचारांवर लक्ष ठेवून नोंद ठेवायची आहे. काळजी करू नका. सोपे आहे. एक छोटी नोंदवही करा. रोज रात्री झोपी जाण्याआधी तुम्ही या नोंदवहीत काही नोंदी घ्या. 

अंदाजे; आजचा मोकळा वेळ_ तास /मिनिटे. 

 मोबाईलवर सोशल मीडियाचा_ वेळ तास /मिनिटे.

 प्रवासाचा वेळ_ तास /मिनिटे.

 जेवण व इतर रोजच्या विधि_ तास /मिनिटे. 

 कुटुंबासोबतचा वेळ_ तास /मिनिटे.

 वाचनाचा वेळ_ तास /मिनिटे.

 आदर्श व्यक्तीसोबत वेळ/चर्चा_ तास /मिनिटे. 

अभ्यासाचा वेळ_ तास /मिनिटे.

 इतर वेळ_ तास /मिनिटे.

    हे सतत सात दिवस ते पंधरा दिवस करा. काय होईल ह्या कृती ने ?? मित्रांनो मी आधीच म्हंटल्याप्रमाणे, तुमचे वेळापत्रक हे तुमच्या विचारांचे प्रतिबिंब आहे. तुमच्या वेळापत्रकावरून तुम्हाला कळेल की सध्याची तुमची विचार प्रक्रिया यशस्वी माणसाप्रमाणे आहे की सामान्य माणसाप्रमाणे. खाली मी अशा काही गोष्टी नमूद करत आहे ज्यापैकी बऱ्याच गोष्टी मी यशस्वी व्यक्तिमत्त्वांना सतत करताना पाहिल्या आहेत. यापैकी तुम्ही किती कृती करीत आहात आणि किती करण्याची तुमची इच्छा आहे.

 १. पहाटे लवकर उठणे –  सामान्य माणसांपेक्षा जास्त वेळ मिळतो.

२.  व्यायाम – शारीरिक व मानसिक स्वास्थ्य योगा चालणे इत्यादी.

३.  आत्मपरीक्षणा साठी एकांतातला वेळ.

४. अशा गोष्टींमध्ये वेळ घालवणे, ज्यामध्ये तुम्ही बदल घडवू शकता, प्रगती करू शकता, सहकार्य करू शकता. ( Passion )

५. रोजचा दिवस आधीच प्लॅन करणे. ( To-Do )

६.  दिवसाच्या सुरुवातीला अति महत्त्वाची कामे पूर्ण करणे. ( एनर्जी मॅनेजमेंट )

७. नवीन माणसांना भेटणे, नातेसंबंध जपणे, अध्यात्मिक प्रगती, मानसिकता बळकट करणे.

८. प्रश्न विचारणे आणि उत्तरे शोधणे ( Taking Interview )

९.  गरजूंना मदत करणे, मार्गदर्शन करणे.

१०. ध्येय साध्य करण्यासाठी प्रभावी मार्ग शोधणे.

११.  नवीन कला अवगत करणे.

         थोडक्यात आपल्या लक्षात येत असेल की, यशस्वी माणसे अशा काही गोष्टी देखील करतात ज्या त्यांना ही आपल्यासारख्या आवडत नाहीत. उदाहरणार्थ व्यायाम, वाचन इत्यादी. आणि हाच यशस्वी आणि सामान्य माणसांमधील फरक आहे. म्हणून मित्रांनो मला आयुष्यात का जगायचे आहे ?  कसे जगायचे आहे ?? आणि त्यासाठी मला काय करायचे आहे ?  या तीन प्रश्नांची उत्तरे मिळवणे हाच या पाठातील आपली शेवटची कृती आहे. त्यामुळे ही कृती पूर्ण कराच. 

कारण;

        “जर तुम्ही तुमचे स्वप्न जगत नसाल, पूर्ण करत नसाल तर तुम्हाला कोणीतरी दुसरे त्यांचे स्वप्न पूर्ण करायास कामाला ठेवेल.”   – धीरूभाई अंबानी

मग जागे व्हा. स्वप्न लिहा आणि कृती करा. पुढील पाठात आपण “ध्येय निश्चिती” शिकणार आहोत. पण त्याआधी तुम्ही सर्वांनी आपली विचार क्षमता बळकट करा. ऊर्जेचा विनियोग करण्याची कला अवगत करा. हाच यशाचा पाया आहे.

 आणि मला संपर्क करायला विसरू नका. 

 खूप खूप शुभेच्छा.

– श्री. अजय खोतू दरेकर 

Subscribe our YouTube Channel @ – https://www.youtube.com/channel/UCdgL8moO1zLc2XmVk64zepw

Read our Blogs @ – http://drajaydarekar.com/


Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top