जाणुन घ्या, तुमच्या मुलाने / विदयार्थ्यांने केलेला अभ्यास – पाठांतर त्याच्या का लक्षात राहत नाही

Share

                   सहसा पालक आणि शिक्षक आपल्या मुलाच्या निकालाच्या दिवशी किंवा परीक्षेच्या कालावधीमध्ये त्याच्या लक्षात ना राहणाच्या समस्येबद्दल बोलताना आढळतात. खरेतर लक्षात न राहण्याची मूळ कारणे समजून घेतली तर त्यावर उपाय करणे सोपे जाते. म्हणून ह्या लेखात आपण मुले पाठांतर केलेले किंवा शिकलेले का विसरतात किंवा त्यांना एखादी गोष्ट शिकण्यात का त्रास होतो त्याची मूलभूत कारणे समजून घेणार आहोत. 

               मी डॉ. अजय दरेकर गेले २० वर्ष Youth Empowerment ह्या क्षेत्रात कार्य करीत आहे व त्या योगाने तरुण व्यावसायिक घडवण्यासाठी Versatile Youth Empowerment (YEP)  हा कार्यक्रम राबवित आहे. तुम्ही पालक  किंवा शिक्षक असाल तर आमचा “असे व्हाल आदर्श “पालक” “शिक्षक” हा गुप जॉईन करू  शकता. By

               आपले मुल/विद्यार्थी ह्याला मेमरी ची अडचण असेल तर पुढील पैकी काही लक्षणे दिसू शकतील,

शब्द विसरणे (स्पेलिंग विसरणे) – खुप वेळा शब्दार्थ व शब्द वाचल्यावर सुध्दा ते लक्षात न राहणे हे एक साधारण लक्षण आहे. 

गणिताच्या पायऱ्या विसरणे – काही वेळेला मुलांना गणिताच्या पायऱ्या लक्षात ठेवणे कठीण जाते.

परीक्षेच्या वेळी पाठांतर केलेलं विसरणे – खुप कष्ट करूनही मुलाला परीक्षेत ह्यामुळे कमी गुण मिळतात 

पाठांतर खुप कष्टाने होणे – काही मुले अभ्यासाच्या व्यतिरिक्त गोष्टींमधे खुप वेगवान प्रगती करतात, जसे की खेळ, कला इत्यादी पण अभ्यास व पाठांतर करण्यास त्यांना खुप वेळ लागतो.

तोंडी परीक्षा किंवा प्रॅक्टिकल मध्ये उत्तम पण लेखी परीक्षेत कमी पडतात –  बरेच पालक/शिक्षक आपल्या मुलाबद्दल हा अनुभव घेतात की मुलाची तोंडी परीक्षा घेतल्यास तो उत्तम रित्या उत्तरे देतो पण तेच लेखी परीक्षेत तो उत्तरे उतरवू शकत नाही.

पालक शिक्षकांनी ह्या गोष्टींचा अर्थ असा घेता कामा नये की मुले मेहनत घेत नाहीत, लक्षात रहण्यामागे भरपूर वेगवेगळी कारणे असू शकतात.

काही महत्त्वाची कारणे ज्यामुळे तुमच्या मुलाला/विद्यार्थ्याला पाठांतर केलेले लक्षात राहत नाही किंवा पाठांतर करायला वेळ लागतो,

माहिती प्रोसेस होण्यास लागणारा वेळ – 

               आपल्या सर्वांना समान मेंदू जरी मिळाला असला तरी आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत फरक असतो, जसा प्रत्येक संगणकाला माहिती पुरवल्या नंतर प्रोसेस करायला वेगवेगळा वेळ लागतो तसेच मुलांच्या प्रोसेस मेमरी ला कमी जास्त वेळ लागू शकतो. याचा अर्थ असा झाला की काही मुलांना नवीन माहिती समजून घेण्यास वेळ लागतो तर काही मुलांना आत मध्ये असलेली माहिती योग्य वेळी आठवण्यास वेळ लागतो. 

ज्या मुलांना (ADHD) चा त्रास असतो त्यांना बऱ्याच वेळेला नवीन माहिती समजून घेण्यास इतर मुलांपेक्षा जास्त वेळ लागतो.

शिकण्याची पद्धत (लर्निग स्टाइल) – 

               प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत ही वेगळी असते हे पालक आणि शिक्षकांनी लक्षात ठेवायला हवे. तसे पाहता बऱ्याच लर्निग स्टाइल आहेत, आपण तीन महत्त्वाच्या समजून घेऊ ज्यामध्ये बहुदा सर्वच मुलांचा समावेश होतो. 

) ऑडिटरी ( ऐकून शिकणारे) – 

                   ह्या मुलांना ऐकून गोष्टी समजतात व लक्षात राहतात. ” मला ऐकू आले” अश्या पद्धतीची ऐकण्यासंदर्भात शब्द व वाक्य ही मुले जास्त वापरतात.

) विसुअल ( बघुन शिकणारे) – 

                   ह्या मुलांना प्रत्यक्षात पाहिलेल्या किंवा कल्पना केलेल्या गोष्टी समजतात व लक्षात राहतात. ” मी ते पाहू शकतो” अश्या पद्धतीचे वाक्य व शब्द ही मुले जास्त वापरतात

) कायनेस्थेतिक ( करून पाहणारे/ शिकणारे) – 

       ह्या मुलांना प्रात्यक्षिक करून पाहिल्यावर गोष्टी कळतात व लक्षात राहतात. ” मला करून पाहुदेत” असे वाक्य किंवा शब्द जास्त वापरले जातात. 

थोडक्यात मुलांना त्यांच्या पद्धतीने गोष्टी समजल्या नाहीत तर त्यांना त्या समजायला व लक्षात ठेवायला जड जातात.

अर्थ कळल्याने लक्षात राहणे– 

           बऱ्याच वेळेला मुलाला / विद्यार्थ्याला ज्या गोष्टी पाठांतर करायच्या असतात त्याचा अर्थ अजिबात कळलेला नसतो किंवा अर्धवट कळलेला असतो, ह्यामुळे अश्या गोष्टी पाठांतर करताना त्यांना जड जाते व पाठांतर केलेच तर पुन्हा आठवणे कठीण जाते. कारण अर्थ न कळल्याने मेंदू त्या माहितीचा कोणत्याही महितीसोबत जोड लाऊन घेत नाही व अशी माहिती सहसा मुले विसरतात. थोडक्यात जर मुलाला हत्ती कसा दिसतो हे नाही कळले तर त्याचे नाव कसे लिहितात हे लक्षात ठेवणे कठीण जाते. व जरी त्याने ते पाठ केले तरी पुन्हा आठवणे कठीण जाते. 

लर्निग डीसाबीलीटी

         हे मेंदूच्या आतमध्ये शिकण्याबाबत तयार झालेली अडचण आहे. काही मुलांना ही गणीतासारख्या विषयमध्ये जाणवते काही मुलांना भाषेच्या विषयामध्ये जाणवते. ह्या मुलांना नवीन गोष्ट शिकण्यास इतर मुलांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो व वेग वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज लागू शकते. 

एकाग्रता कमी असणे – 

           एखादी गोष्ट शिकताना आणखीण एक महत्त्वाची बाब म्हणजे एकाग्रता. हल्ली बऱ्याच मुलांमध्ये एकाग्रता कमी असल्याचे जाणवते. एकाग्रता नसताना आपण काही शिकलो तर मेंदू समजून घेण्यास व लक्षात ठेवने ह्या बाबतीत असमर्थ ठरतो. एखाद्या विषयात आवड नसणे, विषयाची किंवा शिकवणार्याची भीती वाटणे, एकतर्फी शिकवण्याची पद्धत, अशी अनेक कारणे ह्याला लागू पडतात.

शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म मेमरी

           संगणकास जसे शॉर्ट आणि लाँग मेमरी असते तशीच आपल्या मानवी मेंदूमध्ये असते, आपल्या डाव्या मेंदू आणि उजव्या मेंदूमध्ये समन्वयाचा अभाव असल्यास आपल्याला माहिती साठवून ठेवणे व त्याहीपेक्षा योग्य वेळी ती माहिती आठवण्याचा त्रास होतो.

           पालक व शिक्षक मित्रांनो, आज आम्ही मुलांना/विद्यार्थ्यांना गोष्टी लक्षात न राहण्याची कारणे इथे सांगितली, तरी ह्यावरून आपल्या लक्षात आले असेल की एखाद्या मुलाला / विद्यार्थ्याला नवीन ज्ञान समजून घेण्यास व लक्षात ठेवण्यास काहीवेळा किती कठीण जात असेल, आमच्या मते अश्यावेळी रागावणे, शिक्षा देणे हा एकमेव पर्याय नसून, आधी अडचण समजून मग त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.         

पुढील लेखात आपण ह्या अडचणींवर कसे काम करावे हे समजून घेऊ, ही माहिती तुमच्या उपयोगाची आहे का हे आम्हाला नक्की कळवा, शिवाय तुम्हाला शिक्षक /पालक ह्या नात्याने आणखीन काही विषयांवर माहिती जाणून घ्यायची असल्यास नक्की कळवा. आपण पालक व शिक्षकांसाठी एक व्हाट्स अँप ग्रुप चालू केला आहे तुम्ही त्यात सहभागी होऊ शकता, शिवाय जास्तीत जास्त पालक व शिक्षकांना ह्या ग्रुप मध्ये आणण्यास आपण मदत करा.


Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top