तरुण उद्योजकांच्या आयुष्यात “मार्गदर्शक” व “मार्गदर्शनाचे” महत्व

Share

 तरुण व्यावसायिक किंवा व्यवसायिक होऊ पाहणाऱ्या प्रत्येकाकडे उत्साह असतो, कल्पना असतात, आणि काहीवेळा पैसाही असतो किंवा उभा करतायेतो, फक्त नसते ते योग्य मार्गदर्शन आणि योग्य मार्गदर्शक. मार्गदर्शक हा असा घटक आहे जो इतर घटकांना बांधून ठेवतो. मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाने एकतरुण  व्यावसायिक स्वतःचे व्यक्तिमत्व तर घडवतोच शिवाय व्यवसायाची पायाभरणी कोणत्या मूल्यांवर झाली पाहिजे ते ह्या मार्गदर्शनावर ठरते. 

                  मी डॉ. अजय दरेकर गेले २० वर्ष Youth Empowernment ह्या क्षेत्रात कार्य करीत आहे व त्यायोगाने तरुण  व्यावसायिक घडवण्यासाठी Versatile Youth Empowernment हा कार्यक्रम राबवित आहे, तुम्ही तरुण असाल आणि तुम्हाला आमच्या ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तरतुम्ही आमच्या YEP या Whats App ह्या ग्रुप ला जॉईन करू शकता, 

                        मग मित्रांनो समजून घेऊयात एका मार्गदर्शकाचे तरुण व्यवसायिकाच्या आयुष्यात व व्यवसाय वाढीसाठी किती महत्व असते. 

अनुभवातून शिकणे – 

             मार्गदर्शक हा स्वतः व्यवसायिक असला तर त्याने स्वतःचा व्यवसाय चालवताना बहुतेक चढ उतार पाहिलेले असतात, आणि त्यांच्यात्या अनुभवामुळे तो नवीन व्यवसायिकाला एक दृष्टी तर देतोस शिवाय योग्य वेळी योग्य सल्ले देतो. सर्वात महत्वाचे व्यवसायातील वेगवेगळ्या पैलूंशी हेमार्गदर्शक तरुण व्यावसायिकाची ओळख करून देतात. त्याचा परिणाम म्हणून बऱ्याच लहान सहान चुका आणि अडचणी व्यावसायिकाला सहज सोडवता येतात. 

उत्कृष्ट नेटवर्क तयार होणे – 

                एका चांगल्या मार्गदर्शकाचे  स्वतःचे असे व्यापक नेटवर्क असते. व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात त्याने खूप अनुभवी माणसेजोडलेली असतात. ह्या संपर्कांमुळे तरुण व्यावसायिक संभाव्य ग्राहक, भागीदार, गुंतवणूकदार यांच्या संपर्कात येतो व त्याच्या व्यवसायला चांगली पायाभरणीहोते. अनुभव आणि नेटवर्क ह्यामुळे तरुणांना स्वतःच्या संस्थेचा ब्रँड तयार करण्यास खूप हातभार लागतो.  

आत्मविश्वास मिळवणे – 

          व्यवसाय सुरु करणे ही एक धाडशी कृती आहे. तरुण व्यवसायिकांमध्ये अनुभवासोबत आत्मविश्वासाचा अभाव असू शकतो. अश्यावेळी मार्गदर्शकाचा अनुभव हा तरुण व्यवसायिकाला आत्मविश्वास मिळवून देतो. म्हणून एक योग्य मार्गदर्शक हा व्यावसायिकाच्या यशाची आत्मविश्वासानेपायाभरणी करतो. म्हणून एक उत्कृष्ट प्रेरणादायी प्रवास करण्यासाठी तरुणांनीं व तरुण व्यावसायिकांनी एका चांगल्या मार्गदर्शकाची साथ धारावी

ध्येये आणि प्राधान्यक्रम ठरवणे –

           एक चांगला मार्गदर्शक तरुण उद्योजकांना त्यांच्या  ध्येयांबद्दल स्पष्टता आणून देतो. त्याशिवाय सर्वात मोठा गोंधळ जोतरुण व्यवसायिकांचा होतो तो कृत्यांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात. मार्गदर्शक हे प्राधान्यक्रम ठरवून एक चांगली योजना तयार करून देण्यात व्यवसायिकाला मदतकरतात. एकूणच तरुण व्यावसायिकाला लक्ष केंद्रित करून व विचलित होण्यापासून परावृत्त करण्यात त्याचा मोठा वाटा असतो. 

प्रामाणिक अभिप्राय आणि accountable राहणे– 

                           माझा स्वतःचा अनुभव माझ्या मार्गदर्शकांबाबत ( केतन सर ) असा राहिला आहे कि, मी धाडसानेघेतलेल्या निर्णयायांचा व कृतींचा व्यवसायावर कसा परिणाम होतोय किंवा होऊ शकतो याचे प्रामाणिक अभिप्राय मला त्यांच्याकडून मिळत राहिले. त्यामुळे मीयोग्य वेळी व्यवसायाला गरजेचे असलेले बदल करू शकलो. आणखीन एक महत्वाची गोष्ट ज्यामुळे एक व्यावसायिक म्हणून मला माझ्या मार्गदर्शकांचा सर्वातजास्त फायदा झाला  तो म्हणजे accountability. आणि हे एका व्यावसायिकासाठी गरजेचे आहे कारण एक व्यावसायिक हा स्वतःच स्वतःचा बॉस असतो. व त्यामुळे आपण योग्यमार्गदर्शकाला accountable राहिलेच पाहिजे. 

                         एकंदरीत, यशस्वी व्यवसाय सुरू करू आणि वाढवू पाहणाऱ्या तरुण उद्योजकांसाठी मार्गदर्शन व मार्गदर्शक हे एक शक्तिशाली साधन असूशकते. तुमच्या उद्योगाचा अनुभव असलेला आणि ज्याच्यावर तुमचा विश्वास आणि आदर आहे असा सल्लागार शोधणे तुमच्या उद्योजकीय प्रवासात मोठा बदलघडवून आणू शकते.

                       अशा  पद्धतीचे मार्गदर्शन व चर्चासत्र Versatile च्या Youth Empowernment Program व आमच्या YouTube चॅनल वरतुम्हाला मोफत मिळू शकते. तुम्ही त्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप व Youtube चॅनल नक्की Subscribe करा.  


Share

3 thoughts on “तरुण उद्योजकांच्या आयुष्यात “मार्गदर्शक” व “मार्गदर्शनाचे” महत्व”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top