तरुणांनी “आध्यात्मिक उद्योजकता” का समजून घेतली पाहिजे याची ६ कारणे

Share

   आध्यात्मिक उद्योजकता म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आध्यात्मिक विश्वासाची त्याच्या व्यवसायाशी घातलेली सांगड आहे. ज्यामध्ये व्यावसायिक आपल्या अद्वितीय कौशल्याचा, ज्ञानाचा आणि उत्साहाचा उपयोग अर्थपूर्ण मार्गाने इतरांची सेवा व उन्नतीसाठी करतो. म्हणजेच एक व्यवसायिक स्वतःच्या उत्पादनांमार्फत किंवा सेवांमार्फत जगामध्ये सकारात्मक प्रभाव निर्माण करतो. 

                    आज बरेच तरुण केवळ नोकरी किंवा करिअरच्या शोधात नाही आहेत, तर ते असे काही शोधत आहेत ज्यामध्ये त्यांची मूल्ये व आकांक्षा यांचा संगम एका चांगल्या उद्दिष्टासोबत व मिशन सोबत व्हावा. त्यांना त्यांच्या कल्पकतेचा आणि सर्जनशीलतेचा उपयोग समाजात क्रांतिकारक बदल घडवून  आणण्यास करायचा आहे.

              मी डॉ. अजय दरेकर गेले २० वर्ष Youth Empowerment ह्या क्षेत्रात कार्य करीत आहे व त्यायोगाने तरुण व्यावसायिक घडवण्यासाठी Versatile Youth Empowerment (YEP)  हा कार्यक्रम राबवित आहे, तुम्ही तरुण असाल आणि तुम्हाला आमच्या ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही आमच्या मंथन या whats app  ग्रुप ला जॉईन करू शकता,

चला मग तरुणांनी आध्यात्मिक उद्योजकता का समजून घेतली पाहिजे याची ६ कारणे समजून घेऊयात

१. आतला आवाज ओळखणे – 

                               आध्यात्मिक व्यावसायिक तुम्हाला तुमचा आतला आवाज ओळखायला व त्याचा समाजासाठी उपयोग करायला वाव देतो. पारंपरिक व्यवसाय पद्धतीनुसार हे तुम्हाला फक्त यशाचे अनुसरण करायला नाही लावत. ह्या प्रकारच्या व्यवसायात तुमची आवड आणि तुम्ही कशात चांगले आहात याचा विचार होतो. थोडक्यात तुम्हाला मिळालेल्या अद्वितीय शक्तींचा आणि प्रतिभांचा शोध घेऊन त्याचा समाजासाठी उपयोग करणे हा आध्यात्मिक व्यवसायाचा आधारस्तंभ आहे.

२. स्वतःच्या संध्या निर्माण करणे – 

                       असा व्यवसायिक स्वतःच्या संध्या निर्माण करण्याचे स्वातंत्र्य अनुभवतो. कोणीतरी तुम्हाला संधी देईल किंवा त्यासाठी परवानगी देईल याची वाट आध्यत्मिक व्यवसायिक कधीच पाहत नाही. आध्यात्मिक व्यवसायिक नेहमी कृतिशील, पुढाकार घेणारा आणि संसाधनांनी परिपूर्ण असतो त्यामुळेच तो स्वतःच्या संध्या निर्माण करू शकतो. तो नेहमी समाजाला भेडसावणाऱ्या अडचणींचा विचार करीत असतो व त्यावर उपाययोजना शोधतो. जगामध्ये अपेक्षित बदलला तो स्वतःपासून सुरुवात करतो.  

३. शिकण्यास व प्रगती करण्यास प्रोत्साहित करते – 

                          आध्यात्मिक व्यावसायिकता तुम्हाला कधीच कम्फर्ट झोनमध्ये राहू देत नाही आणि सामान्य असे काही करू देत नाही, ती सतत तुम्हाला नवीन व उत्कृष्ट करण्याचा ध्यास देते म्हणून तुम्ही शिकण्यास आणि प्रगती करण्यास तत्पर असता. असा व्यवसायिक अभिप्राय घेत राहतो व त्याप्रमाणे सुधारणा करत राहतो. तो अपयशाला खुल्या मनाने स्वीकारतो व त्याप्रमाने सुधारणा करतो. उलट तो सुधारणा करण्याबाबत उत्साही असतो. आम्ही VYEP मध्ये ह्या गुणाला LLL (लाईफ लॉंग लर्नर) असे म्हणतो.  

४. समविचारी लोकांसोबत जोडते– 

                 पारंपारिक व्यवसायिकाप्रमाणे हा इतरांची स्पर्धा करीत नाही व सर्व स्वतःही करीत नाही तर तो समविचारी माणसांना जोडतो. तो समविचारी माणसांना आपले व्हिजन व मूल्ये समजावून सांगतो. तो सहयोग आणि सहनिर्मिती याचा विचार करून माणसे जोडतो. अश्या पद्धतीचे नेटवर्क तयार करून सर्वांची प्रगती करणे हे त्याचे उद्धिष्ट असते. 

५. आनंद, समृद्धी आणि समाधान देते – 

                     आध्यात्मिक उद्योजक कधीही पैसा, प्रसिद्धी किंवा पदाचा पाठलाग करीत नाही तो ह्या सर्वांपासून अलिप्त असतो. आपल्याला जे आवडते ते करणे आणि आपण जे करतो त्यावर प्रेम करणे म्हणजे आध्यात्मिक व्यावसायिकता. तुमच्या कामाला एक अर्थ आणि उद्धिष्ट असते. असा व्यावसायिक इतरांच्या जीवनात आणि जगात सकारात्मक बदल घडवण्याचे कार्य करीत असतो. 

६. प्रामाणिकता आणि नैतिकतेची प्रेरणा देते – 

                                    असा व्यवसायिक आपण कोणीतरी असण्याचा भास तर आणीत नाहीच शिवाय तो सचोटीशी कधीही तडजोड करीत नाही. आध्यात्मिक व्यावसायिकता म्हणजे प्रत्येक कृती प्रामाणिक व नैतिकतेने करणे होय. असा व्यवसायिक आपल्या ग्राहक, भागीदार, कर्मचारी, गुंतवणूकदार, पुरवठादार इत्यादींशी प्रामाणिक आणि पारदर्शक असतो. पर्यायाने तो स्वतःशी व मूल्यांशी प्रामाणिक असतो. 

                     तुम्ही व्यवसायिक असला किंवा होऊ इच्छित असला तर आमच्या YEP (Youth Empowerment Program) च्या मोहिमेत पुढील WhatsAppग्रुप द्वारे जॉईन होऊ शकता, शिवाय आमच्या YouTube चॅनल ला नक्की Subscribe करा.


Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top