“का बऱ्याच भारतीय शाळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यात अपयशी ठरत आहेत?”

Share

                     भारतीय शिक्षण व्यवस्था NEP २०२० च्या माध्यमातून परिवर्तनाच्या एका मोठ्या  टप्प्यावर आहे. तरीही गेली ३० ते ४० वर्षात जे भारतीयशाळांनी करणे अपेक्षित होते ते फार कमी शाळांनी करून दाखवले आहे. आपला विद्यार्थी अजुणही पारंपरिक करिअर निवडत आहे, फार कमी विद्यार्थ्यांमध्येव्यवहार कौशल्य आढळते. आपले संस्कार हरवत चालले आहेत. 

                    त्यामुळे भारतीय शाळांना आपल्या कार्यपद्धतीमध्ये मूलभूत बदल करावे लागतील व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी NEP प्रमाणे शिक्षक, पालक व समाज ह्यांना एकत्रित आणावे लागेल. एकूणच आपण चुकत आहोत हे मान्य केल्याशिवाय शाळा स्वतःमध्ये आणि पर्यायाने विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तनघडवून आणू शकत नाहीत.  

                   मी डॉ. अजय दरेकर गेले २० वर्ष Youth Empowerment ह्या क्षेत्रात कार्य करीत आहे व त्यायोगाने तरुण व्यावसायिक घडवण्यासाठीVersatile Youth Empowerment (YEP)  हा कार्यक्रम राबवित आहे, तुम्ही तरुण असाल आणि तुम्हाला आमच्या ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेलतर तुम्ही आमच्या मंथन या whats app  ग्रुप ला जॉईन करू शकता,

                     हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सर्व भारतीय शाळा आणि शिक्षक सारख्या चुका करत नाहीत, परंतु काही शैक्षणिक संस्थांमध्ये काही सामान्यसमस्या आहेत. येथे काही चुका आहेत ज्या भारतीय शाळा आणि शिक्षक विद्यार्थ्यांचे सर्वांगिण विकास करताना आढळतात

१. वैयक्तिक लक्षाचा अभाव: 

                 अनेक भारतीय शाळांच्या वर्गखोल्यांमधील विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या विशिष्ट गरजा आणिशिकण्याच्या शैली पूर्ण करणे शिक्षकांना कठीण होऊ शकते. यामुळे विद्यार्थ्यांना उपेक्षित वाटते किंवा संकल्पना समजून घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो. 

              आम्ही जेव्हा विविध शाळांना भेटी देतो व त्यांच्यासोबत काम करतो त्यावेळी लक्षात येते कि भरपूर विद्यार्थी मिळवणे व वर्ग पूर्णपणे भरणे हे उद्दिष्ट पुढे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना बौद्धिक व मानसिक कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत असेल ह्याकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष होते. 

२. व्यावहारिक व्यावसायिक कौशल्यांवर मर्यादित लक्ष: 

                भारतातील शैक्षणिक प्रणाली व्यावसायिक कौशल्यांवर मर्यादित भर देऊन, अनेकदा शैक्षणिक अभ्यासक्रमाकडे झुकते.  यामुळे विद्यार्थी व्यावहारिकक्षेत्रात मागे पडतात आणि त्यांचे करिअर चे पर्याय पारंपारिक शैक्षणिक मार्गांच्या पलीकडे जात नाहीत. त्याचा परिणाम म्हणून आज लाखो विद्यार्थ्यांना करिअरचेमोजकेच प्रचलित पर्याय ठाऊक असतात. खरेतर व्यवहार कौशल्य हे शिक्षणाचे मूळ असले पाहिजे. मी जे शिकत आहे, वाचत आहे, त्याचा माझ्या रोजच्याआयुष्यात कसा उपयोग करता येईल ह्याबाबत विद्यार्थी बऱ्याच वेळेला अनभिज्ञ असतो. 

              शिवाय शाळांच्या ह्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिकता व व्यवसाय ह्या बाबतीत उत्साह निर्माण होत नाही आहे. त्या ऐवजी विद्यार्थी वपालक पारंपरिक नोकऱ्या किंवा स्वयं रोजगाराव्यतिरिक्त नाविन्यपूर्ण व्यवसायांचा विचार देखील करीत नाहीत. 

३. तंत्रज्ञानाची अपुरी साथ: 

                 तंत्रज्ञानामध्ये अध्यापन आणि शिकण्याचे अनुभव वाढवण्याची क्षमता असली तरी, भारतीय वर्गखोल्यांमध्ये तत्रंज्ञानाला अजूनही मर्यादा आहेत. तंत्रज्ञानाची उपलब्धता नसणे किंवा शैक्षणिक तंत्रज्ञान साधनांचा वापर करण्यासाठी शिक्षकांना अपुरे प्रशिक्षण यामुळे विद्यार्थ्यांमधील डिजिटल साक्षरताकौशल्ये विकसित होण्यास अडथळा निर्माण होतो. आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात हा खूप मोठा प्रश्न आहे. 

             आर्टीफिसिअल इंटेलिजन्स ने भारतात आपलेपाय रोवू केलेत आणि तरीही भारतातल्या लाखो विद्यार्थ्यांना संगणक हाताळायला मिळत नाही. 

४. भाषेतील अडथळ्यांची आव्हाने: 

                      भारतासारख्या विविध भाषा असलेल्या देशात, विद्यार्थ्यांना भाषेच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो, विशेषत: जेव्हा इंग्रजी त्यांची पहिलीभाषा नसते तेव्हा अशी उदाहरणे दिसून येतात. ह्यामुळे इंग्रजीमध्ये शिकवल्या जाणार्‍या विषयांच्या आकलनात मोठा अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे त्यांच्याएकूण शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होतो. मी पाहिले आणि अनुभवलं आहे बऱ्याच खेडेगावात इंग्रजी शाळांच्या नावाने मुले व पालकांना भरपूर फीस भरूनसुद्धा मूल्य आधारित शिक्षणापासून लांब राहावे लागते. 

           भाषा हे शिक्षणाचे माध्यम आहे भाषा म्हणजे शिक्षण नव्हे हि संकल्पना शाळांनी प्रामाणिक पणे मान्य करून पालकांचे प्रबोधन करायला हवे.  जपान, चायना, फ्रान्स, जर्मनी, रशिया, स्पेन आणि ब्राझील ह्या देशांनी हे सिद्ध करून दाखवले आहे कि मातृभाषेतून शिक्षणाचा सरळ सरळ परिणाम हा मुलांच्याप्रगतीवर तर आहेच शिवाय देशाची प्रगती साधण्यात सुद्धा हे महत्वाचे ठरते. त्यामुळे भारतीय शाळांनी इंग्रजी व इतर भाषा, भाषा म्हणून शिकवायला हवे.  

५. मुलांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष: 

                      वाढत्या शैक्षणिक दबाव आणि सामाजिक अपेक्षांमुळे विद्यार्थ्यांमधील मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. तथापि, बऱ्याच शाळांमध्येमानसिक आरोग्य सहाय्य सेवांची तरतूद अपुरी पडते , शाळांमध्ये समुपदेशक व तत्सम सेवा अपुऱ्या आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक आरोग्याकडे लक्ष दिलेजात नाही. सध्या टीव्ही, इंटरनेट च्या युगात मुलांना मानसिक स्थरावर जे सहन करावे लागत आहे त्यावर शाळा उपाययोजना करण्यास उत्सुक दिसत नाहीत. 

             पालक व मुलं यांच्या सामोपदेशनाची जबाबदारी हि शाळांनी घ्यायला हवी कारण ती  विद्यार्थी विकासाची एक मूलभूत पायरी ठरते.  शिवाय त्यातून करिअरनिवडण्यासाठी स्व ओळख सुद्धा मुलांना होते. 

६. वैविध्यपूर्ण दृष्टीकोनांचा अभाव: 

              भारतीय शाळांमध्ये कधीकधी अभ्यासक्रमात वैविध्यपूर्ण दृष्टीकोनांचा अभाव दिसून येतो , ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध संस्कृती, धर्म आणि जागतिकदृश्यांबद्दलचे आकलन हव्या त्या प्रमाणात होत नाही. ही मर्यादा सहानुभूती, सहिष्णुता आणि जागतिक मानसिकतेच्या विकासात अडथळा निर्माण करते. हेविश्वची माझे घर हा भारतीय संस्कृतीचा पाया. 

               त्यामुळे कमीत कमी भारतातील वैविध्यतेचा अभ्यास आणि आकलन विद्यार्थ्यांना व्हायला हवा. शाळांनी भारतीयव जागतिक इतिहास, भूगोल, संकृती पुस्तकाबाहेर जाऊन समजावण्याचा प्रयत्न करायला हवा. इंटरनेट मुळे आज जग जवळ आले आहे त्याचा चांगला उपयोगह्यासाठी करता येईल.  

७. अपुरे शिक्षक प्रशिक्षण आणि विकास: 

                भारतातील काही शिक्षकांना पुरेसे प्रशिक्षण आणि व्यावसायिक विकासाच्या संधींचा अभाव आहे. यामुळे त्यांच्यात शिकवण्याच्या पद्धती आणिविद्यार्थ्यांना प्रभावीपणे गुंतवून ठेवण्याच्या क्षमता पूर्णतः निर्माण होत नाहीत. अद्ययावत अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोनांसह शिक्षक अद्ययावत राहतील याची खात्रीकरण्यासाठी सतत व्यावसायिक विकास महत्त्वाचा आहे. मुलांच्या मेंदूचा विकास होत असताना कराव्या लागणाऱ्या शास्त्रशुद्ध पद्धतींचा त्यामुळे बऱ्याचशाळांमध्ये अभाव आहे.

                       खाजगी शाळांमध्ये मिळणारे तुटपुंजे वेतन ह्यामुळे शिक्षक बऱ्याच शाळांमध्ये फक्त एक साधारण घटक झाला आहे. त्याचा स्वतःवरचाआत्मविश्वास एवढा कमी आहे कि तो नवीन काही शिकू पाहत नाही त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत आहे. शिकवणे हे पैसे कमावण्याचे साधन अशीमानसिकता दिसून येऊ लागली आहे. विशेषकरून खेडेगावातील शाळांमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे. 

८. व्यावहारिक जीवन कौशल्यांवर मर्यादित लक्ष: 

                   शाळा काहीवेळा व्यावहारिक जीवन कौशल्ये शिकवण्याकडे दुर्लक्ष करतात. जसे की आर्थिक साक्षरता, संवाद कौशल्ये, समस्या सोडवणे आणिभावनिक बुद्धिमत्ता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वास्तविक जगाच्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या त्यांच्या क्षमतेसाठी ही कौशल्ये महत्त्वाचीआहेत. याचाच परिणाम म्हणून आज आपल्याला शालेय परीक्षेत हुशार ठरलेले असंख्य विद्यार्थी जरी दिसत असले तरी, त्यापैकी फार थोडे सृजनात्मक, आत्मविश्वास असलेले, पुढाकार घेणारे , निर्णय क्षमता असलेले, नेतृत्व गुण असलेले आढळतात. 

                 डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांनी पाहिलेला तरुण व त्या अनुषंगाने देश बघायचा असेल तर भारतीय पालक व विद्यार्थ्यांना जागरूक राहावे लागेल. वस्वतःला विचारात राहावे कि जे शिक्षण मी घेत आहे ते नक्की मला शिक्षित करत आहे कि नाही. दुसरीकडे शाळांनी प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये भावी नागरिक बघूनत्यातील अद्वितीय गुणवत्ता शोधण्यास त्याला मदत करायला हवी. 


Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top